• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

Eknath Shinde reaction on Narayan Rane offer: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला होता त्यानंतर आता त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad yatra) दरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेत कंटाळले आहेत आणि ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे. नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या या ऑफरवर आता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मला वाटतं त्यांनी हा शोध कुठून लावला मला माहिती नाही. माझ्या विभागात मला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्या विभागात मातोश्रीचा हस्तक्षेप आहे असं म्हणणं चुकीचं आहे. राणेसाहेब हे युती काळात मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना माहिती आहे की, धोरणात्मक किंवा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीने सामूहिकपणे घ्यावा लागतो. राणे केंद्रीय मंत्री आहेत, उद्या त्यांना मोठा निर्णय घ्यायचा असेल किंवा पॉलिसी डिसिजन घ्यायचा असेल तर पंतप्रधानांच्या संमतीने घ्यावा लागेल." "नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य एकप्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अशाप्रकारे संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. राणेंनी केलेल्या वक्तव्यात कोणतेही तथ्य नाहीये" असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले होते नारायण राणे? जनआशीर्वाद यात्रे दरम्यान पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले होते, शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना कोणताही निर्णय घ्याचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे. शिवसेनेत ते फक्त नावापुरते मंत्री राहिले आहेत. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना मातोश्रीला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: