मुंबई 24 जून : शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील होण्याचा पर्याय निवडला आहे. यामुळे फक्त शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडी सरकारची चिंता वाढली आहे. अशात आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने या आमदारांविरोधात कारवाईचा प्रयत्न सुरू केला आहे. व्हिपनंतरही बैठकीला उपस्थित न राहिलेल्या आमदारांना अपात्र ठरवणार असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Assam CM Himanta Biswa Sarma : आसाममध्ये महाराष्ट्राचे आमदार राहतात का हे माहित नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचं अजब वक्तव्य
आमच्याकडे 40 शिवसेना आमदार आणि 12 अपक्ष आमदार आहेत. अशात अल्पमतात असताना गटनेता बदलता येत नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आमदारांना अपत्रा ठरवण्याबाबतच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की बैठकीला हजर नाही म्हणून एखाद्याला अपात्र ठरवणं हे हस्यास्पद आणि बेकायदेशीर आहे. याचा कोणताही परिणाम आमदारांवर होणार नाही.
शिंदे म्हणाले की त्यांनी आमच्या दोन महिला आमदारांनाही नोटीस बजावली. मात्र आमच्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही कितीही नोटीस बजावल्या तरी आमच्यावर परिणाम होणार नाही. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत. सध्या आकड्याला खूप महत्त्व आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला हा अधिकार आहे. कायदेशीर लागणारं संख्याबळ आमच्याकडे आहे, त्यापेक्षाही जास्त संख्याबळ आमच्याकडे आहे, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.
'महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं अजिबात दुःख नाही; पण लोकशाहीसाठी हे घातक' : राजू शेट्टी
आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधिमंडळ कायद्यांतर्गत झिरवळ कारवाई करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या आमदारांवर कारवाई करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.