Home /News /mumbai /

'कार्यकर्त्यांना सांगा, आम्ही शिवसेनेतच'; 4 तासाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांना सूचना

'कार्यकर्त्यांना सांगा, आम्ही शिवसेनेतच'; 4 तासाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांना सूचना

बंडखोर आमदार आपला स्वतंत्र गट स्थापन करणार, भाजपसोबत जाणार की खरी शिवसेना आपणच असल्याचा दावा करणार, याबाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

    गुवाहाटी 25 जून : राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले 50 बंडखोर आमदार नक्की काय निर्णय घेणार, यावर संपूर्ण गणित अवलंबून आहे. अशात हे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडूनही प्रयत्न सुरू आहे. बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र, आमदारांची संख्याच सह्यानिशी दाखवली बंडखोर आमदार आपला स्वतंत्र गट स्थापन करणार, भाजपसोबत जाणार की खरी शिवसेना आपणच असल्याचा दावा करणार, याबाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजेपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चर्चेसाठी एक बैठक घेतली. यानंतर प्रत्येक बंडखोर आमदाराच्या खोलीत जाऊन शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. 'आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर तुम्ही जबाबदार'; एकनाथ शिंदेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांनीही सर्व आमदारांची एक एक करून भेटली घेतली. यावेळी सर्व आमदारांना आपल्या कुटुंबीयांसोबत बोलायला सांगितलं. तसंच सांगण्यात आलं की, 'कार्यकर्त्यांना सांगा आजही आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत'. यासोबतच 'विधानसभा उपसभापतींना तो अधिकार नसल्याने आपल्यावर अपात्र कारवाई करता येणार नाही, असं आश्वासन सर्व आमदारांना देण्यात आलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या