• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले, भाजपमध्ये आले तर स्वागतच' नारायण राणेंचा दावा

'एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले, भाजपमध्ये आले तर स्वागतच' नारायण राणेंचा दावा

 'राष्ट्रवादीबद्दल राज ठाकरे यांचे म्हणणे मी खोडत नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले'

'राष्ट्रवादीबद्दल राज ठाकरे यांचे म्हणणे मी खोडत नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले'

'राष्ट्रवादीबद्दल राज ठाकरे यांचे म्हणणे मी खोडत नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले'

 • Share this:
  मुंबई, 21 ऑगस्ट : 'शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे शिवसेनेत कंटाळले आहे. त्यांना कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे' असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी केला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा ( janashirvada yatra) सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी नालासोपाऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. 'शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे फक्त नावापुरते मंत्री राहिले आहे. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना 'मातोश्री'ला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. ते शिवसेनेत कंटाळले आहे, मी त्यांना फोन करणार आहे, जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे, असा दावाच राणे यांनी केला. तसंच, आमदार नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेतं आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले. आता त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे, ते पहा म्हणावे, असा टोलाही राणेंनी लगावला. चुकून भारतीय सीमेत आली पाकिस्तानी मुलं, भारतीय जवानांनी दिलेली वागणूक पाहून... तसंच, राष्ट्रवादीबद्दल राज ठाकरे यांचे म्हणणे मी खोडत नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले, ते अगदी बरोबर बोलले होते. उद्या जर मनसे आणि भाजपची युती झाली तर आम्हाला आनंदच आहे, असंही राणे म्हणाले. 'आम्हाला बघून लोक थांबत आहे. आम्ही गर्दी करत नाही लोक आमच्याकडे येत आहे, मला भीती नाही का जीवाची? पिंजऱ्यात राहणाऱ्यांनी आम्हाला उपदेश करू नये. मी सांगतो मी गेल्या ७ वर्षात काय केले , मी माझ्या पैशाने माझ्या वडिलांचे स्मारक केले. लोकांचे पैशाने केले नाही. त्याला दलदलीत ठेवले नाही', अशी टीकाही राणेंनी शिवसेनेवर केली. 'बाळासाहेबांच्या स्मारकावर अभिवादन केलं. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. गोमुत्र शिपडणाऱ्यांनी नको ते उद्योग न करता हवे ते उद्योग करावे', असा टोलाही राणेंनी शिवसेनेला लगावला. दिलासादायक! तालिबाननं अपहरण केलेले सर्व भारतीय सुखरुप 'उद्योजकांना भेटलो त्याच्या समस्या सोडवेन असे आश्वासन दिले, गेल्या 7 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कारभार, देशांचे जगात नाव उंचवण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी सर्व पैसे त्यांनी दिले. आपण आर्थिक महासत्ता बनेल या दिशेनं चाललो आहे' असंही राणे म्हणाले. 'देशांतील ८०% उद्योग माझ्याकडे येतात. लोकांना रोजगार मिळावा यासाठी उद्योग सुरू केले पाहिजे, आपली आयात कमी झाली पाहिजे आणि देशांतील पुरवठा वाढवलं पाहिजे. लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असंही राणे म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published: