Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीस आहेत तरी कुठे? एकनाथ शिंदे यांना भाजपकडून मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा

देवेंद्र फडणवीस आहेत तरी कुठे? एकनाथ शिंदे यांना भाजपकडून मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा

देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांसमोर दिसत नाहीत. त्यामुळे फडणवीस कुठे आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर अनेक हालचाली दिसत आहेत.

    मुंबई, 23 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) यामुळे अस्थिर बनलं आहे. मात्र एवढं सगळं केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न सर्वांना पडत आहे. या परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावेल. मात्र राज्यात वेगाने राजकीय हालचाली होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नेमके कुठेत असा प्रश्न पडतो. काही वेगळी समीकरणं राज्यातील राजकारणात दिसतील अशी दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगला सोडल्याने अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडे सरकार टीकवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यात आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं आहे. झी 24 तासच्या वृत्तानुसार, भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive Video समोर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांसमोर दिसत नाहीत. त्यामुळे फडणवीस कुठे आहेत असा प्रश्न सगळ्यांना पडत आहेत. फडणवीस गप्प बसले नसून पडद्यामागून नक्कीच मोठ्या घडामोडी सुरु आहेत हे नक्की.  देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर अनेक हालचाली दिसत आहेत. भाजपचे अनेक नेते त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे राज्यातील पुढील राजकीय वाटचालीसाठी रणनिती आखली जात असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतही चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे. 'शिवसेनेचा जन्म संघर्ष करण्यासाठीच'; ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावताच अनिल परब यांची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांचा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांची सही असलेलं एक पत्र लिहिलं, या पत्रात राजकुमार पटेल, बच्चू कडू, राजेंद्र पाटील, नरेंद्र भोंडेकर या अपक्ष आमदारांची सही आहे, तर या पत्रावर सही असलेले नितीन देशमुख गुजरातहून महाराष्ट्रामध्ये आले आहेत. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या या आमदारांची संख्या 36 झाली तरी एकनाथ शिंदे यांना दोन-तृतियांश शिवसेना फोडण्यासाठी आणखी एका आमदाराची गरज लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 आमदार असतील तर त्यांना वेगळा गट स्थापन करता येईल तसंच कोणत्याही आमदाराला पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    पुढील बातम्या