मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत आमदारांची सोडली नाही साथ, मुख्यमंत्री झाल्यानंतरही सर्वात पुढे

एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत आमदारांची सोडली नाही साथ, मुख्यमंत्री झाल्यानंतरही सर्वात पुढे

 पहिल्यांदाच कोणा आमदारांसाठी अशा प्रकारची सुविधा देण्यात आली होती.

पहिल्यांदाच कोणा आमदारांसाठी अशा प्रकारची सुविधा देण्यात आली होती.

पहिल्यांदाच कोणा आमदारांसाठी अशा प्रकारची सुविधा देण्यात आली होती.

मुंबई, 2 जुलै : 11 दिवसांच्या राजकीय बंडानंतर अखेर शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत परतले आहेत. त्यांना मुंबई विमानतळ ते हॉटेल ताजपर्यंत विशेष कॉरिडोर करण्यात आला होता. पहिल्यांदाच कोणा आमदारांसाठी अशा प्रकारची सुविधा देण्यात आली होती. यावेळीदेखील एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बसच्या पुढच्या सीटवर बसून आमदारांना पाठिंबा देत होते.

21 जूनपासून सुरू झालेल्या या राजकीय भूकंपात शेवटपर्यंत एकनाथ शिंदेंनी आमदारांची साथ सोडली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून ते आमदारांसोबत होते. सुरुवातीला ते आमदारांना सुरतमध्ये घेऊन गेले. येथून गुवाहाटीमध्ये नेतानाही ते आमदारांच्या सोबत होते. दरम्यान बरेचदा त्यांनी कधी मुंबई तर कधी गुजरातवारी केली. मात्र शेवटी ते आमदारांकडेच परतत होते. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी मुंबईत येऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर ते मुंबई राहू शकले असते. मात्र ते पुन्हा रात्रीतून गोव्याला आमदारांकडे गेले. आणि आज पुन्हा आमदारांसोबत एकत्र परतले.

या 11 दिवसांच्या काळात एकनाथ शिंदे आमदारांचं नेतृत्व तर करीत होतेच. मात्र त्यांनी आमदारांच्या सुरक्षेचाही पुरेपूर विचार केला. आज मुंबईत काही अनुचित घडू नये यासाठी विशेष कॉरिडोर करण्यात आला होता. यावेळी बसमध्येही सर्वात पुढे एकमाथ शिंदे बसले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेगळी गाडी केली नाही. ते आमदारांसोबत एकत्र हॉटेलमध्ये पोहोचले.

11 दिवस 4 शहरं 4 हॉटेल...

11 दिवसांच्या या कालवधीत आमदारांना अनेक ठिकाणी हलवण्यात आलं. महाराष्ट्रात राजकीय भूकंप होत असताना आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे त्यांना सांभाळून होते. यात भाजपकडूनही मोठा मदत केली जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Mla, Shivsena