Home /News /mumbai /

फडणवीस झाले मोठे, एकाच दगडात मारले अनेक पक्षी,शिवसेनेपुढे धर्मसंकट?

फडणवीस झाले मोठे, एकाच दगडात मारले अनेक पक्षी,शिवसेनेपुढे धर्मसंकट?

विशेष म्हणजे, शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे.

    मुंबई, 30 जून :  ते पुन्हा येणार असं म्हणत सर्व जण देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाची वाट पाहत होते. पण, देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde Chief Minister ) यांना मुख्यमंत्री देऊन मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई करणार का हे पाहण्याचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज मोठे वळण मिळाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषद फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची निवड करून आपल्याला मुख्यमंत्रिपद नको आहे, असे स्पष्ट केले आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिंदेंच्या बंडामागे फडणवीस यांचा हात असल्याची चर्चा रंगली होती. पण, फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद शिंदे देऊन राजकीय टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यामुळे शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणार का हा मोठा प्रश्न आहे. काय म्हणाले फडणवीस? "शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहेत. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल", अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीकडून सुरु असलेल्या कामे, आणि प्रचंड भ्रष्टाचार बघायला मिळाले. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणी जेलमध्ये जाणार ही खेदजनक बाब होती. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित असलेल्या मंत्री जेलमध्ये जातो तरी त्याला मंत्रिपदावरुन काढला जातो. शेवटच्या दिवशी संभाजीनगर झाली. पण ते कधी झालं? राज्यपालांचं पत्र आल्यानंतर जाताजाता संभाजीनगर, धारावीश, दि.बा. पाटील अशाप्रकारचे निर्णय झाले. त्याला वैध मानले जाणार नाही. पण त्याला आमचं समर्थनच आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. आमच्याच मतदारसंघात आमचे हारलेले विरोधक यांना रोज निधी दिला जात असेल तर आम्ही कशाच्या भरोश्यावर लढायचं, अशा प्रकारचा विषय झाल्यानंतर या सगळ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची युती तोडा, असा निर्णय घेतला. मात्र, दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या ऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त महत्त्व दिलं आणि शेवटपर्यंत त्यांचीच कास धरुन ठेवली. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर फार बोलणार नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या