मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदाचा मोह सुटेना, नव्या ट्वीटमधून शिवसेनेला डिवचलं

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदाचा मोह सुटेना, नव्या ट्वीटमधून शिवसेनेला डिवचलं

 शिवसेनेनं गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आहे. पण, शिंदेंनी गटनेतेपद अजूनही सोडलं नाही.

शिवसेनेनं गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आहे. पण, शिंदेंनी गटनेतेपद अजूनही सोडलं नाही.

शिवसेनेनं गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आहे. पण, शिंदेंनी गटनेतेपद अजूनही सोडलं नाही.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 26 जून :  शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (mva government) धोक्यात आले आहे. शिवसेनेनं गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी केली आहे. पण, शिंदेंनी गटनेतेपद अजूनही सोडलं नाही. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून शाहू महाराज यांना अभिवादन केलं आहे. मात्र, शिंदे यांनी शाहू महाराज यांचं ट्वीट केलेल्या पोस्टरमध्ये अजूनही एकनाथ शिंदे हे गटनेते असल्याचा उल्लेख आहे. एवढंच नाहीतर सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री ठाणे आणि गडचिरोली याचाही उल्लेख आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेनं पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावर हटवलं आहे. त्यांच्या जागीच कट्टर शिवसैनिक अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. अजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही मान्यता दिली आहे. पण, एकनाथ शिंदे यांनी अजय चौधरी यांची नियुक्त अवैध असल्याचा दावा केला होता. एवढंच नाहीतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला होता. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 38 आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये  तळ ठोकून आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर शिंदेंच्या गटात सामील झाले आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना केसरकर यांनी आपली भूमिका मांडत इशारा दिला आहे. 'आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्षांनी मान्यता दिली तर दुसऱ्या क्षणाला आम्ही मुंबईत येऊ. आम्ही मनापासून प्रेम करणारे आहोत. जो लढा कोकणात उभा केला, तोच लढा मुंबई उभा करू शकतो. कोकणी माणसांनी शिवसेना उभी केली आहे, असा इशाराही केसरकरांनी दिला. 'आम्ही आमचा गट तयार केला आहे. पुढचा निर्णय काय करायचा हे अजून ठरलं नाही. तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहात, त्याच लोकांनी शिवसेना उभी केली, त्यांनी रक्त आटवलं आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून काढून टाकलं आहे. एकीकडे लोकांना बोलण्यासाठी पाठवलं आणि दुसरीकडे गटनेतेपदावरून काढून टाकलं. हे चुकीचे आहे. अगदी त्यांचं ऐकून घ्या, मग कारवाई करा. पण, असं झालं नाही, असंही केसरकर म्हणाले.
First published:

पुढील बातम्या