Home /News /mumbai /

राज्याच्या राजकारणाला नवे वळण, एकनाथ शिंदेंची सावध भूमिका, आधी...

राज्याच्या राजकारणाला नवे वळण, एकनाथ शिंदेंची सावध भूमिका, आधी...

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस

    मुंबई, 30 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (uddhav thackeray resigns as cm) दिला आहे. आता भाजपचे विरोधी पक्षनेेेेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. पण, मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाच्या चर्चेबाबत एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाबाबत फडणवीस यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असा खुलासा शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. पुढील दोन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे. आज एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार हे गोव्यातून मुंबईमध्ये येणार आहे. पण, त्याआधीच खातेवाटपाबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, 'भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका' असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस'असंही शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान,शिवसेना नेते एकनाथ शिंदे त्यांच्या काही प्रमुख आमदारांसह आज दुपारी मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईत महत्वाची बैठक करून परत गोव्याला जाणार आहे.बाकी आमदार हे गोव्यातच थांबणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या