मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एकनाथ खडसेंना मोठा झटका, पत्नीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; अटकेची शक्यता

एकनाथ खडसेंना मोठा झटका, पत्नीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; अटकेची शक्यता


'विकास कामात आपण कधीही खोडा घातलेला नाही, उलट खडसे यांनी तो घातला'

'विकास कामात आपण कधीही खोडा घातलेला नाही, उलट खडसे यांनी तो घातला'

मुंबई सेशन कोर्टाने (Mumbai Sessions Court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळए मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 12 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा (Pune land case) प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadses bail application rejected ) यांना कोर्टाने दणका दिला आहे. मुंबई सेशन कोर्टाने (Mumbai Sessions Court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळए मंदाकिनी खडसे यांच्या अटकेची शक्यता आहे.

भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना कोर्टाचा दणका आहे.  या प्रकरणी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा  अटकपूर्व जामीन अर्ज  फेटाळून लावला आहे. त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याच्या शक्ता आङे. तर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा मिळाला आहे.  या प्रकरणी 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

Bigg Boss च्या घरात असं काय झालं ज्यामुळे सुरेखाताई चिडल्या अन् तडकाफडकी...,

मागील महिन्यात ईडीकडून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र (Charge Sheet)दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे.

Cibil Score चांगला असेल तर त्वरित मिळेल कर्ज, फॉलो करा या 6 महत्त्वाच्या Tips

त्याआधी याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.

First published: