Home /News /mumbai /

नाथाभाऊंनी कोरोनाला हरवलं, रोहिणी खडसे यांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

नाथाभाऊंनी कोरोनाला हरवलं, रोहिणी खडसे यांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

खबरदारी म्हणून पुढील काही दिवस एकनाथ खडसे हे डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली राहणार आहे.

मुंबई, 24 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (rohini khadse)यांनी  कोरोना मात केली आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी यांची कोरोनाची चाचणी (Corona Test) निगेटिव्ह आली असून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यापाठोपा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुले पुढील  उपचारासाठी मागील आठवड्यात खडसे मुंबईत दाखल झाले होते. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Bombay Hospital) दाखल करण्यात आले होते. अखेर आज उपचाराअंती एकनाथ खडसे यांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांचीही कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याचबरोबर रोहिणी खडसे आणि त्यांची दोन्ही जुळी मुलं सारा आणि समरजित यांचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तिघांना बॉम्बे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून पुढील काही दिवस एकनाथ खडसे हे डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली राहणार आहे. एकनाथ खडसे यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पहिल्यांदा कोणाला मिळणार लस? मोदींनी केलं स्पष्ट; उद्धव काय म्हणाले? खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर जळगावमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जळगाव दौऱ्याचे नियोजन केले होते. परंतु, रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. तसंच एकनाथ खडसे यांचीही प्रकृती ठीक नव्हती, त्यामुळे शरद पवार यांना आपला उत्तर महाराष्ट्रातला दौरा रद्द करावा लागला होता. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. एकनाथ खडसे यांच्यासोबत अलीकडंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या