Home /News /mumbai /

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार, जयंत पाटलांची घोषणा

एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार, जयंत पाटलांची घोषणा

'एकनाथ खडसे यांच्यासोबत अनेक नेत्यांना येण्याची इच्छा आहे. अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहे.'

    मुंबई, 21 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचं आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. 'भारतीय जनता पक्षाचे गेले तीन ते साडेतीन दशक नेतृत्व करणारे नेते, आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. 'एकनाथ खडसे यांचा शुक्रवारी प्रवेश होत आहे. त्यानंतर त्यांना काय जबाबदारी दिली जाणार हे नंतर ठरणार आहे, असं ही पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्यासोबत अनेक नेत्यांना येण्याची इच्छा आहे. अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहे.  पण कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे निवडणुकात सध्या परवडणार नाही. त्यामुळे टप्प्याने त्यांना प्रवेश दिला जाणार आहे, असंही खडसेंनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला आहे. हे आम्हीच नाहीतर भाजपचे नेते सुद्धा खासगीत बोलत असतात. त्यामुळे त्यांनी भाजपच्या पक्षबांधणीसाठी मोलाचे काम केले आहे. त्यांच्यावर अन्याय होत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असंही पाटील म्हणाले. दरम्यान, न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना  एकनाथ खडसे यांनी सर्व चर्चांना विराम देत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. आज संध्याकाळपर्यंत भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या