राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी; खडसेंचा समावेश, काँग्रेसच्या यादीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारं नाव

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी; खडसेंचा समावेश, काँग्रेसच्या यादीत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारं नाव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेदेखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील, अशी चिन्ह आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाबाबत सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत खलबतं सुरू आहेत. याच नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्या कॅबिनेट बैठकही होणार होती. परंतु अद्याप नावे निश्चित न झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे. मात्र या 12 आमदारांची संभाव्य यादी न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे.

भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हेदेखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील, अशी चिन्ह आहेत.

दुसरीकडे, काँग्रेसकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का देत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेत पाठवलं जाऊ शकतं. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि नंतर पक्षातील मतभेदांमुळे त्या काँग्रेसपासून दूर झाल्या. मात्र आता त्या पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हेदेखील विधीमंडळात दिसू शकतात. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत शिवसेनेकडून त्यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी माघार घेणाऱ्या माजी आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनाही शिवसेनेकडून संधी दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

- राष्ट्रवादी

एकनाथ खडसे

राजू शेट्टी

आदिती नलावडे

आनंद शिंदे

- शिवसेना

आदेश बांदेकर

मिलिंद नार्वेकर

सुनील शिंदे

सचिम अहिर

- काँग्रेस

उर्मिला मातोंडकर

सत्यजित तांबे

नसीम खान

सचिन सावंत/राजू वाघमारे

Published by: Akshay Shitole
First published: October 27, 2020, 11:04 PM IST

ताज्या बातम्या