एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक संपली, निर्णय गुलदस्त्यात!

एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक संपली, निर्णय गुलदस्त्यात!

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधान भवनात मुख्यमंत्री कार्यालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी कायम आहे. आज मुंबईत एकनाथ खडसे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधान भवनात मुख्यमंत्री कार्यालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता पोहोचले होते. या भेटीआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यात खातेवाटपाबाबत बैठक झाली. या बैठकीनंतर खडसे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 15-20 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीला आदित्य ठाकरे, यांच्यासह एकनाथ शिंदे हेही हजर होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, ही बैठक सकारात्मक झाली असून उद्धव ठाकरे यांनी 'तुमचं स्वागत आहे' असं खडसे यांना म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान,  सोमवारी नवी दिल्लीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना, 'एकनाथ खडसे  यांच्याशी जुने संबंध आहे', अशी सुचक प्रतिक्रिया दिली होती.

एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांची नाराजी वाढताना दिसत आहे. यामध्ये फक्त एकनाथ खडसे यांचाच नाही तर पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. विधानसभेतील पराभवानंतर आता पंकजा मुंडे पक्षातून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत. रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी एकनाथ खडसे-पंकजा मुंडे यांची भेट होणार आहे.

भाजपमध्ये का वाढत आहे धूसफूस?

विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. भाजपचा संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत राहिला. त्यातच मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेसोबत वाद झाल्याने भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. सत्ता गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे हे नाराज नेते खरंच भाजप सोडणार का, हे पाहावं लागेल.

Published by: sachin Salve
First published: December 10, 2019, 7:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading