• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • दिवाळीच्या शुभेच्छांऐवजी ‘ईद मुबारक’! शिवाजी पार्कातील रोषणाईवरून जोरदार ट्विटरबाजी

दिवाळीच्या शुभेच्छांऐवजी ‘ईद मुबारक’! शिवाजी पार्कातील रोषणाईवरून जोरदार ट्विटरबाजी

मुंबईतील शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईत दिवाळीच्या शुभेच्छांऐवजी (Eid message displayed on screen situated at Shivaji Park) ईद मुबारकचा संदेश दिसल्यामुळे भाजपनं जोरदार टीका केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 नोव्हेंबर: मुंबईतील शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईत दिवाळीच्या शुभेच्छांऐवजी (Eid message displayed on screen situated at Shivaji Park) ईद मुबारकचा संदेश दिसल्यामुळे भाजपनं जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षी शिवाजी पार्कवर (Lighting by MNS leader) लायटिंग केलं जातं. मात्र या दरम्यान, लायटिंगवर ईद मुबारक चा संदेश दिसल्यानंतर जोरदार ट्विटरबाजीला सुरुवात झालीय. नेमकं काय घडलं? मुंबईत दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लायटिंग करण्यात येतं. या लायटिंगमध्ये एक एलईडी स्क्रीनदेखील लावण्यात आली आहे. या स्क्रीनवरून वेगवेगळे संदेश दाखवता येऊ शकतात. तर याच स्क्रीनवर अचानक ईद मुबारक असा संदेश झळकला आणि ट्विटरबाजीला जोरदार ऊत आला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकारावर जोरदार टीका केली आहे. राणेंची टीका आता काय उरलंय? असा सवाल करत नितेश राणेंनी आयोजकांना झोडपून काढलं आहे. शिवाजी पार्कवरील दिवाळीच्या शुभेच्छांमधूनही ईदचा संदेश येतो. महाराष्ट्रात हिंदूंना काही स्थान आहे की नाही, असा सवाल विचारत मविआ सरकारला दिवाळीशी काही देणंघेणं आहे की नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. हे वाचा-सचिन वाझे पोलिसांच्या ताब्यात आल्याचा अनिल देशमुखांनी मुहूर्त साधला? मनसेकडून स्पष्टीकरण या प्रकाराबाबत मनसेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या यंत्रणेचं उद्घाटन सोमवारी कऱण्यात आलं. त्यापूर्वी टेस्टिंग करत असताना जुने संदेश स्क्रीनवर डिस्प्ले झालेले असून शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. टेस्टिंगदरम्यान एखाद्या वेळी तो संदेश दिसला असेल आणि कुणीतरी रेकॉर्ड केला असेल, याचा अर्थ आयोजक त्याला जबाबदार आहेत, असा होत नाही, असं स्पष्टीकरण मनसेनं दिलं आहे.
  Published by:desk news
  First published: