मंत्रालयात ज्ञानेश्वर साळवे इफेक्ट; खिडक्यांना ग्रील बसवणार

काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्र्वर साळवे या तरुण शेतकऱ्याने शेतीमालाचा भाव पडल्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून 'शोले स्टाईल'आंदोलन केलं होतं. आत्महत्या करण्याची धमकी दिली होती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 20, 2017 02:17 PM IST

मंत्रालयात ज्ञानेश्वर साळवे इफेक्ट; खिडक्यांना ग्रील बसवणार

 मुंबई,20 नोव्हेंबर: तुळजापूर येथील तरूण शेतकरी ज्ञानेश्वर साळवे याने शेतीमालाचे भाव पडल्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली होती. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावरील खिडक्यावरील मोकळ्या जागेत आता लोखंडी ग्रील बसविले जाणार आहेत.

मंत्रालयात येणाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्र्वर साळवे या तरुण शेतकऱ्याने शेतीमालाचा भाव पडल्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर चढून 'शोले स्टाईल'आंदोलन केलं होतं. आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. मंत्री व अधिकाऱ्यांना घाम फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर खिडक्यांच्यावर ग्रील बसविण्याची सूचना करण्यात आली आहे.

या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेत मंत्रालयातील खिडक्याच्या वरील जागेत लोखंडी ग्रील व चौकटी असलेल्या ठिकाणी तातडीने दरवाजे बसविण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.

मंत्रालयात ग्रील बसवल्याने मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल पण शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...