मुंबईतील अमेरिकी वकिलातीत प्रमुखपदावर एडगर्ड कगान रुजू

एडगर्ड कगान मुंबई-स्थित अमेरिकी वकिलातीत 1 ऑगस्ट २०१७, पासून कामावर रुजू झाले आहेत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2017 06:26 PM IST

मुंबईतील अमेरिकी वकिलातीत प्रमुखपदावर एडगर्ड कगान रुजू

01 आॅगस्ट : एडगर्ड कगान मुंबई-स्थित अमेरिकी वकिलातीत 1 ऑगस्ट २०१७, पासून कामावर रुजू झाले आहेत. कगान वकिलातीचे प्रमुख म्हणून पदभार सांभाळतील. त्यांच्या आधी टॉम वायडा हे पद भूषवित होते.

मुंबईत येण्याआधी कगान कौलालंपूर (मलेशिया) येथील दूतावासात उपप्रमुख या पदावर काम करीत होते. त्याखेरीज त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. ते वॉशिंग्टनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या यु एस मिशनचे उपसंचालक होते, त्याशिवाय चीन, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, इस्राईल आणि आयव्हरी कोस्ट आणि अनेक ठिकाणी त्यांनी काम केली. कगान येल विद्यापीठातील स्नातक पदवीधारक आहेत, ते १९९१साली अमेरिकी परदेश सेवेत रुजू झाले.

"पश्चिम भारतात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना मला आणि माझ्या परिवाराला अत्यंत आनंद होत आहे, येथील सर्व लोकांना भेटण्याची संधी मला मिळणार आहे. भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेताना मला फार आवडेल," अशी प्रतिक्रिया कगान यांनी दिली.

कगान यांच्या मुंबईतील वास्तव्यामध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आणि तीन मुलं असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2017 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...