मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Bhavana Gawali: शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स

Bhavana Gawali: शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स

भावना गवळी या चौकशीला हजर झाल्याच नाही. आज त्यांना चौकशीला हजर व्हायचे होते.

भावना गवळी या चौकशीला हजर झाल्याच नाही. आज त्यांना चौकशीला हजर व्हायचे होते.

शिवसेनेच्या खासदाराला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  मुंबई, 29 सप्टेंबर : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Shiv Sena MP Bhavana Gawali) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. भावना गवळींच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक झाल्यावर आता भावना गवळींना ईडीकडून समन्स (ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali) आले आहे. त्यानुसार आता भावना गवळी यांना येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  भावना गवळींच्या निकटवर्तीयाला अटक

  शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संबंधित असणाऱ्या 9 ठिकाणांवर ED ने छापेमारी केल्यानंतर, परभणी येथील पाथरी याठिकाणी ED ने मंगळवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी EDच्या अधिकाऱ्यांनी भावना गवळी यांचे निकटवर्तीय असणाऱ्या सईद खान (Saeed Khan) यांना अटक केली आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टचं कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. सईद खान हे संबंधित कंपनीचे संचालक आहेत.

  ईडीने परभणी जिल्ह्यातील पाथरी याठिकाणी छापेमारी केली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सईद खान यांना अटक केली असून ते भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार पाहात होते. हरीश सारडा यांनी तक्रार केल्यानंतर ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.

  ED च्या जाळ्यातून तुर्तास वाचले सेनेचे नेते आनंदराव अडसूळ, तब्बल 14 तास होते अधिकारी सोबत!

  नेमकं प्रकरण काय आहे?

  1992 मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्डाची पणन संचालकाकडे नोंद करून कारखान्याची स्थापना केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमने बालाजी पार्टीकल बोर्डला 43 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. 2000 सालापर्यंत हा कारखाना फक्त नावाला उभा होता. सुरू मात्र झाला नव्हता. 2001 मध्ये भावना गवळी या कारखान्याच्या अध्यक्षा झाल्या. त्यानंतर 2002 मध्ये भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची 14 हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने आपलीच दुसरी संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. विशेष म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी गवळी यांनी शासनाची परवानगी घेतली नव्हती. त्यानंतर 2007 मध्ये राज्य शासनाने बालाजी पार्टीकल बोर्डला विकण्याची परवानगी दिली. तसेच भावना गवळी यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली. हा कारखाना विकण्यासाठी जिल्हा उप निबंधकांने काही अटी शर्ती लावल्या होत्या.

  यानंतर 2010 मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना भावना गवळी यांचे पीए अशोक गांडोळी यांचे 90 टक्के शेअर असलेल्या भावना ऍग्रो प्रायव्हेट लिमीटेडला विकण्यात आला. यासाठी रिसोड अर्बन क्रेडिट कॉ. बँकची 10 कोटीची बँक गॅरंटी घेत शासनाची परवानगी न घेता विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. याच व्यवहारात मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप हरीश सारडा यांनी ईडीकडे केला आहे. त्यानंतर ईडीने आज ही कारवाई करत भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचे व्यवहार सांभाळणाऱ्या सईद खान यांना अटक केली आहे.

  First published:
  top videos

   Tags: ED, Shiv sena