Home /News /mumbai /

परिवहन मंत्री Anil Parab यांच्या अडचणीत वाढ, ED कडून आणखी एक समन्स

परिवहन मंत्री Anil Parab यांच्या अडचणीत वाढ, ED कडून आणखी एक समन्स

अनिल परब अडचणीत; ईडीकडून आणखी एक समन्स

अनिल परब अडचणीत; ईडीकडून आणखी एक समन्स

ED summons Maharashtra transport minister Anil Parab: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने आता दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Maharashtra Transport Minister Anil Parab) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स (ED summons to Anil Parab) बजावले आहे. त्यानुसार आता 28 सप्टेंबर रोजी अनिल परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप अनिल परब यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने हा समन्स बजावला आहे. सचिन वाझे गृहविभागातील बदल्यांच्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला होता. तसेच सचिन वाझे याने दिलेल्या आपल्या कथित स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करत म्हटलं होतं की, बदल्या थांबवण्यासाठी अनिल परब यांना 20 कोटी रुपये मिळाले होते. संजीव पलांडेवर आरोप सचिन वाझे याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही आरोप केला होता. तसेच अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक संजीव पलांडे याच्यामार्फत पैशांची देवाणघेवमा करण्यात आल्याचं म्हटलं होतं. वाझेचा गंभीर आरोप सचिन वाझे याने आरोप करत म्हटले होते की, पोलीस दलातील डीसीपींच्या मार्फत 40 कोटी रुपये जमा करण्यात आलेले. त्यापैकी 20 कोटी रुपये हे अनिल परब आणि अनिल देशमुख यांना देण्यात आले. अनिल देशमुख यांना पैसे हे त्यांच्या स्वीय्य सहाय्यकाच्या मार्फत देण्यात आले होते. यापूर्वीही अनिल परब यांना ईडीचा समन्स अनिल परब यांना यापूर्वी सुद्धा ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राण्यास सांगितले होते. मात्र, अनिल परब हे त्यावेळी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शिवसेनेच्या नेत्यानेच अनिल परबांची माहिती सोमय्यांना दिली, मनसेच्या वैभव खेडेकरांच्या विधानाने खळबळ शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. मग ही माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक दावा मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Anil parab, ED

    पुढील बातम्या