मुंबई, 30 सप्टेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) यांना ईडीने आतापर्यंत अनेकदा समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर आता अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (money laundering case) राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड (Kailash Gaikwad) यांना ईडीने समन्स बजावले आहे.
न्यूज एजन्सी एएनआयने या संदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये एएनआयने म्हटलंय, अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कैलास गायकवाड यांना ईडीने समन्स बजावले आहे. तसेच चौकशीसाठी ईडीने आज हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.
Enforcement Directorate (ED) summons Deputy Secretary (Home) of Maharashtra Kailash Gaikwad in an alleged money laundering case related to former state home minister Anil Deshmukh. He has been asked to appear before the agency today: ED pic.twitter.com/Y5YBUaDWRz
— ANI (@ANI) September 30, 2021
ईडीने कैलास गायकवाड यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, या संदर्भात कैलास गायकवाड यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. अनिल देशमुख हे अद्याप ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले नाहीयेत. आता गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहतात का हे पहावं लागेल.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकत 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. सचिन वाझे याला मुंबईतील बार मालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचं परमबीर यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही द्यावा लागला होता. यानंतर पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत ईडीकडून तपास सुरू आहे.
अनिल देशमुखांच्या संबंधित मालमत्तांवर Income Tax ची धाड
17 आणि 18 सप्टेंबर रोजी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्या संबंधित मालमत्तांवर धाड टाकली होती. आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली होती. नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे पथक सुद्धा उपस्थित होते.
25 मार्च रोजी सीबीआयने पहिल्यांदा अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला
24 एप्रिल रोजी ईडीने पहिल्यांदा अनिल देशमुख यांच्या निवस्थानी छापेमारी केली केली
त्यांनतर 16 मे, 26 मे, 16 जुलै आणि 6 ऑगस्टला परत ईडीने कारवाई केली होती
17 आणि 18 सप्टेंबरला इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली
कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त
दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, ED