'आदर्श'मुळे अशोक चव्हाणांचा पत्ता कट, काँग्रेसचे हे दोन नेते घेणार शपथ

'आदर्श'मुळे अशोक चव्हाणांचा पत्ता कट, काँग्रेसचे हे दोन नेते घेणार शपथ

आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांना पुन्हा फटका बसलाय. सुरुवातीलाच वाद नको म्हणून काँग्रेसचं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : राज्यात महाआघाडीच्या सरकारचा आज शपथविधी शिवाजी पार्कवर होणार आहे. शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेससह मित्रपक्षांच्या या आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आहे. गुरुवारी उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे दोन मंत्री शपथ घेतील असं म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या या मंत्रिमंडळात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा शपथ घेतील असं बोललं जात होतं मात्र आदर्श प्रकरणातल्या नव्या चौकशीच्या फेऱ्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जातंय. शपथविधीआधीच अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदर्श सोसायची घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा चौकशी सुरु केली आहे. बुधवारी कुलाब्यातील आदर्श सोसायटीमध्ये ईडीचे पथक पोहचले. आदर्श सोसायटीमध्ये पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरलाय का? अजित पवारांनी केला खुलासा

कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आदर्श घोटाळा 2010 मध्ये समोर आला होता. आता पुन्हा होणाऱ्या चौकशीमुळे त्यांचं नावं मंत्रिपदाच्या यादीतून गायब झालंय. आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे दोन नेते शपथ घेतील असं निश्चित समजलं जातंय. तर पृथ्विराज चव्हाण यांचं विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी घेतलं जात असल्याने तेही आज शपथ घेणार नाहीत.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आता काही तासांमध्ये शपथ घेणार आहेत. त्यावेळी अजित पवार नाराज असल्याचं पुन्हा एकदा पुढे आल्यानं खळबळ उडाली होती. तर अजित दादा नॉटरिचेबल आहेत असंही सांगितलं जात होतं. नंतर अजित पवार हे संपर्कात असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. नंतर अजित दादा हे शरद पवारांच्या भेटीलाही आले होते. त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा प्रदीर्घ चर्चा झाली. राष्ट्रवादीचा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री असावा असा आग्रह अजित पवारांनी धरल्याचं पुढे येतंय. शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी त्याबद्दल खुलासा केलाय.

पहिल्या यादीतून अजित पवारांचा पत्ता कट; जयंत पाटील म्हणाले...

त्यात भर पडलीय ती छगन भुजबळांचं ताजं वक्तव्याची. 'आजच्या शपथविधीसाठी शरद पवारांनी दोन नेत्यांना निवडलंय, त्यातला एक मी आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात दिली. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

 

 

Published by: Ajay Kautikwar
First published: November 28, 2019, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading