Home /News /mumbai /

डॉन इक्बाल मिर्चीच्या साम्राज्याला EDचा दणका, 22 कोटींची संपत्ती केली जप्त

डॉन इक्बाल मिर्चीच्या साम्राज्याला EDचा दणका, 22 कोटींची संपत्ती केली जप्त

गेल्या काही वर्षांपासून ईडी आणि इतर संस्था या यासंदर्भात कारवाई करत होत्या. या गुंडांनी दहशतीच्या जोरावर प्रचंड माया जमवली होती. त्यानंतर तो पैसा विविध व्यवसायात गुंतवून त्यातून पुन्हा काळा पैसा जमा केला.

मुंबई 20 ऑक्टोबर:  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस राहिलेल्या इक्वाबल मिर्ची याच्या सामाज्र्याला EDने जबरदस्त दणका दिला आहे. मिर्ची याच्या 7 महागड्या संपत्ती जप्त करण्यात आल्या असून त्याची बाजारातली किंमत ही 22 कोटी 32 लाख एवढी आहे. यात एक सिनेमा थिएटर, मुंबईतील हॉटेल, फार्म हाऊस, मोठा बंगला,  थंड हवेचं ठिकाण असलेल्या पाचगणी इथली 3 एकरपेक्षा जास्त जागा याचा समावेश आहे. या आधी देखील EDने त्याची संपत्ती जप्त केली असून एकूण जप्त केलेली संपत्ती ही आता 798 कोटींवर गेली आहे. इक्बाल मिर्ची हा दाऊदचा मुंबईतला कारभार बघत होता. इक्बालचा 2013 मध्ये लंडनला मृत्यू झाला. इक्बालनं मुंबईतले सी फेसिंग असेलेले चार फ्लॅट्स एक हजार कोटींना विकले आणि तो पैसा दाऊदनं युरोपात रिअल इस्टेटमध्ये गुंतवला अशी माहिती दिली जाते. त्याच बरोबर ब्रिटन, तुर्की, स्पेन, सायप्रस, दुबई आणि मोरक्को इथंही दाऊदनं गुंतवणूक केल्याचंही बोललं जातं. मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने  गँगस्टर इक्बाल मिर्ची याचा जवळचा सहकारी हुमायूं मर्चंटला वर्षभरापूर्वी अटक केली होती. त्यानंतर एका महिला हस्तकाला अटक करण्यात आली होती.  ईडीचा आरोप आहे की ही महिला हस्तक आणि तिच्या कुटुंबाचे इक्बाल मिर्चीशी संबंध आहेत. तिने  40 कोटी रुपयांची दलाली मिळवून दिली होती. त्याकडे फक्त मुंबईतील वरळी परिसरातील मालमत्तेत कागदावर काही भाडेकरु होते. मुंबई लोकलबद्दल अखेर निर्णय झाला, उद्यापासून महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा गेल्या काही वर्षांपासून ईडी आणि इतर संस्था या यासंदर्भात कारवाई करत होत्या. या गुंडांनी दहशतीच्या जोरावर प्रचंड माया जमवली होती. त्यानंतर तो पैसा विविध व्यवसायात गुंतवून त्यातून पुन्हा काळा पैसा जमा केला. या पैशांमधून दहशतवाद्यांनाही मदत केली जात होती असाही आरोप सुरक्षा संस्थांनी केला आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Dawood ibrahim

पुढील बातम्या