Home /News /mumbai /

'इथं ईडीच्या नोटीस दिल्या जातात', शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले होर्डिंग!

'इथं ईडीच्या नोटीस दिल्या जातात', शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले होर्डिंग!

आमदार आणि नेत्यांच्या कुटुंबीयांना ईडीने (ED) नोटीस बजावल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मुंबई, 29 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारच्या  (MVA Goverment) आमदार आणि नेत्यांच्या कुटुंबीयांना ईडीने (ED) नोटीस बजावल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसैनिकांनी आपल्या जुन्या स्टाईलप्रमाणे  ईडी कार्यालयानंतर आता थेट भाजपच्या कार्यालयाबाहेर (BJP Office Mumbai) होर्डिंग ठोकले आहे. शिवसैनिकांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर सोमवारी रात्री होर्डिंग लावले आहे. 'ED येथे भाजप विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात.' अशा आशयाचे होर्डिंग भाजप मुख्यलायाबाहेर लावण्यात आलेत. यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना मुंबईच्याय रस्त्यांवर पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी  मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचे नावच बदलून टाकले. ईडीच्या कार्यालयावर हे 'भाजप प्रदेश कार्यालय' असं सांगत बॅनरच लावले  होते. शिवसैनिकाच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर दुसरीकडे डोंबिवलीमध्ये  शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे  बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनर वरती खासदार राऊत यांनी केलेली विधाने टाकण्यात आली आहे. येत्या काही महिन्यामध्ये केडीएमसी आणि इतर महापालिका निवडणूक असल्याने हाच मुद्दा घेऊन शिवसेना आक्रमक होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. 'त्या' व्यवहाराबद्दल राऊतांचा खुलासा दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीच्या नोटिसीबद्दल पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. ईडीची नोटीस ही दीड महिन्यांपूर्वी आली होती, अशी कबुलीही राऊत यांनी दिली. 'माझी पत्नी वर्षा राऊत हिच्या नावावर 10 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मध्यमवर्गीय घराती मराठी शिक्षिका असलेल्या वर्षाने घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे.  भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे' असा खुलासाही राऊत यांनी केला. भारतात शिरला नवा कोरोना, ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह 'जर पैशांच्या व्यवहारांची चौकशीच केली जात असेल तर भाजपचे अकाऊंट उघडा, गेल्या 3 वर्षांमध्ये  किती कोटींच्या देणग्या दिल्या आहे, त्याचा हिशेब भाजपच्या नेत्यांनी करावा, माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब आता माझ्याकडे आहे.  त्यासंदर्भातील माहिती सचिन सावंत यांनी ट्वीट सुद्धा केली आहे, भाजपच्या एका खासदाराचा एका बांधकामात सहभाग आहे, मग त्यांना नोटीस का नाही पाठवली?' असा सवालही राऊत यांनी विचारला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या