राज ठाकरेंना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश!

मनसे अशा नोटीशींना भीक घालत नाही. सरकार आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 11:47 PM IST

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, चौकशीला हजर राहण्याचे आदेश!

मुंबई 18 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. कोहिनूर मिल प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्टला चौकशीला हजर राहण्यास राज ठाकरे यांना सांगण्यात आलंय. राज यांना अशा प्रकारची नोटीस बजावली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मनसे अशा नोटीशींना भीक घालत नाही. सरकार आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय.

देशपांडे म्हणाले, कोहिनूर मिलचं प्रकरण अतिशय जुनं आहे. एवढी वर्ष झाल्यानंतर सरकारला आत्ताच जाग का आली असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या काळात जोरदार आवाज उठवला होता. त्यामुळेच त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोदींच्या नावाने काही तरी हवं; भाजप खासदार म्हणाले, 'या' विद्यापीठाचं नाव बदला!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईडीच्या निशाण्यावर असल्याच्या बातम्या येत होत्या त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना 2 ऑगस्टला पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी ईडीबाबत प्रतिक्रिया दिली होती. 'मला कोणीही हॅलो करण्यासाठी आलेलं नाही. मी या सगळ्याबद्दल फक्त तुमच्याकडून बातम्या ऐकत आहे,' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.

फक्त पाक व्याप्त काश्मीरबद्दल चर्चा होईल; राजनाथ सिंह यांनी दिले सडेतोड उत्तर!

Loading...

राज्यात विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज यांना नोटीस मिळाल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे. येत्या 21 तारखेला मुंबईत EVM विरोधात सर्व पक्षीय मोर्चा आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेतलाय. त्यानंतर एक दिवसांनी राज यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे.

राज यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणुकांची भेट घेतली होती. त्याचबरोबर कोलकात्यात जाऊन ते ममता बॅनर्जींनाही भेटले होते. त्यांनीही पूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 11:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...