Home /News /mumbai /

संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांना ED चे नवे समन्स, 'या' दिवशी हजर राहाण्याचे आदेश

संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांना ED चे नवे समन्स, 'या' दिवशी हजर राहाण्याचे आदेश

संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

    मुंबई, 29 डिसेंबर: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Mp Sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varash Raut) यांना अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस बजावल्यामुळे राज्यात रान पेटलं आहे. त्यात आता ED कडून वर्षा राऊत यांना नवे समन्स बजावण्यात आले आहेत. येत्या 5 जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असं वर्षा राऊत यांना सांगण्यात आले आहे. संजय राऊत यांचे बंधु प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीची यापूर्वी चौकशी झाली आहे. आता केवळ वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणे बाकी असल्याचं ED च्या समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. हेही वाचा... हसन मुश्रीफ संतापले, म्हणाले..ग्रामपंचायत निवडणुकीची 'ही' पद्धत लोकशाहीला घातक दरम्यान, EDने वर्षा राऊत यांना आज 29 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ED ने नवे समन्स बजावण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे संजय राऊत आता कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची सेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी सामना ऑफिसमध्ये भेट घेतली. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ED ने नोटीस बजावली आहे. त्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ही भेट झाली असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा राऊत यांना नोटीस देण्यात आली म्हणून त्या आज चौकशीला जाणार नाही. आम्ही ईडीकडे दोन-चार दिवसांची मुदत मागितली आहे, असंही राऊत यांनी सांगितले होते. ईडीकडून त्यांच्या पत्नीला 3 नोटीस आहे. आम्हाला जी नोटीस देण्यात आली आहे. ती मी अद्याप पाहिली नाही. ती नोटीस पाहण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हे राजकारण कशा प्रकारे सुरू आहे, ते आम्हाला चांगले माहिती आहे. माझ्याकडे भाजपच्या नेत्यांची यादी आहे. त्यांनी केलेल्या व्यवहाराची पूर्ण कागदपत्र तयार आहे. ही यादी दिल्यानंतर ईडीला जास्त काम मिळणार आहे, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला होता. 'ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था आहे. जर कुठला कागद हा माझ्या घरी येत असेल तर त्याचा आदर आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. माझ्याकडेही ईडीला देण्यासाठी बरीच कागदपत्र आहे. त्यामुळे नोटीसीला उत्तर हे नोटीसने दिले जाईल' असा इशाराही राऊत यांनी दिला. दरम्यान, PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं. हेही वाचा.. नवी मुंबईत भाजपच्या अडचणी वाढल्या, गणेश नाईकांच्या गडाला शिवसेनेनं लावला सुरूंग वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या