मोठी बातमी : तबलिगी जमात प्रकरणी मुंबईतील 4 ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू

मोठी बातमी : तबलिगी जमात प्रकरणी मुंबईतील 4 ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू

मुंबईतील अंधेरी, SV रोड यासह एकूण 4 ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : तबलिगी जमातशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये मुंबईसह इतर काही भागांचा समावेश असल्याची माहिती आहे. मुंबईतील अंधेरी, SV रोड यासह एकूण 4 ठिकाणी ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत.

तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याविरोधात 17 एप्रिल रोजी पैशाच्या अफरातफर प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाईला वेग आला असून मुंबतही छापेमारी करण्यात येत आहे.

याप्रकरणी प्रश्न विचारला असता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सध्या तरी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर तबलिगी जमात चर्चेत आली होती. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला. या कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि कोरोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाले होते.

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2020, 11:04 AM IST

ताज्या बातम्या