मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक तर राज्यात मंत्र्याची ED कडून 12 तासांपासून चौकशी सुरू

BREAKING : दिल्लीत राष्ट्रवादीची बैठक तर राज्यात मंत्र्याची ED कडून 12 तासांपासून चौकशी सुरू

तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

मुंबई, 07 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्री आणि नेत्यांविरोधात ईडीचा (ed) ससेमिरा अजूनही कायम आहे. राम गणेश गडकरी साखर कारखाना (Ram Ganesh Gadkari Sugar Factory) व्यवहार प्रकरणी  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सकाळी 9 वाजेपासून सुरू झालेली चौकशी 12 तास उलटले तरी सुरूच आहे.

2012 साली अहमदनगरच्या राम गणेश गडकरी साखर कारखाना प्रकरणी ईडीने प्राजक्त तनपुरे यांना ईडीने समन्स बजावला होता. अखेर आज सकाळी तनपुरे ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर झाले होते. सकाळी ९ वाजता ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. गेल्या १२ तासांपासून त्यांची चौकशी सुरूच आहे.

'मम्मी... उतार दो...', Paragliding चा हा नवा मजेशीर VIDEO तुम्ही पाहिलात का?

साखर कारखान्याच्या व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र को ऑप बँकेनं वाटप केलेल्या कर्जात आर्थिक घोटाळा झाले होते.  या बँकेनं साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं.

राम गणेश गडकरी साखर कारखान्याची 26 कोटी मूळ किंमत होती. मात्र हा कारखाना प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीनं 12 कोटीत विकत  घेतला होता. या कारखान्याला महाराष्ट्र बँकेचं कर्ज होतं. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळेच तनपुरे यांची चौकशी सुरू आहे.

सलमान खानचं सर्वात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण का अधुरं राहिलं?

याआधी अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी,अर्जुन खोतकर यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा ईडीच्या चौकशीला सामोर जावं लागलं आहे.

प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत राहुरीमधून भाजपचे शिवाजी कर्डीले यांचा त्यांनी पराभव केला होता. तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत. एकीकडे राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक सुरू आहे तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्याची 12 तासांपासून चौकशी सुरू आहे.

First published: