राज ठाकरेंचे भागीदार शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांची ईडीकडून एकत्र चौकशी

राज ठाकरेंचे भागीदार शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांची ईडीकडून एकत्र चौकशी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकरदेखील ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. त्यामुळे उन्मेश जोशी आणि शिरोडकर यांची एकत्र चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट : कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी उन्मेष जोशी यांची आज पुन्हा चौकशी सुरू आहे. सोमवारी उन्मेश यांची तब्बल आठ तास चौकशी झाली होती. चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केलं असून आणखी चौकशी होणार असल्याचं उन्मेश जोशी यांनी सांगितलं होतं. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकरदेखील ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. त्यामुळे उन्मेश जोशी आणि शिरोडकर यांची एकत्र चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दुसरीकडे मनसे पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात तातडीची बैठक आहे. राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, 22 तारखेला म्हणजे गुरूवारी राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावल्यानंतर मनसेनं ठाण्यात 22 तारखेला बंदची घोषणा केली होती. पण हा बंद मनसेनं सध्या मागे घेतला आहे.

उन्मेष जोशींची चौकशी

दरम्यान, व्यावसायीक आणि मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांचीही याच प्रकरणात ईडीने आज चौकशी केली. ही चौकशी तब्बल आठ तास चालली. चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केलं असून आणखी चौकशी होणार असल्याचं उन्मेश जोशी यांनी सांगितलं.

राज यांना चौकशीसाठी बोलावल्यास मनसे ठाणे बंद करेल असा इशाराही देण्यात आला होता. लोकांनी त्या दिवशी प्रेमाने बंद ठेवला तर चांगलं आहे, नाही तर कार्यकर्त्यांच्या रोषाला समोरं जावं लागेल असा इशारा मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. महाराष्ट्रात त्या दिवशी जे घडेल त्याला शासन व सरकार जवाबदार असेल असंही ते म्हणाले होते. राज ठाकरे यांना ईडी ची नोटिस म्हणजे ईव्हीएम ला विरोध केल्याचा राग आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बंद नको असा निर्णय घेतल्याने हा बंद मागे घेण्यात आला.

इतर बातम्या - प्रेमासाठी मुलीने वडिलांच्या गळ्यावर 10 वेळा फिरवला चाकू, बाथरूममध्ये जाळला मृतदेह

राज ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलाय.

राज ठाकरेंवरची 'ईडी'ची पीडा टाळण्यासाठी हजारो मनसैनिक देणार साहेबांची साथ!

देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

मागील लोकसभा निवडणुकीत, राज ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात काही प्रश्न निर्माण केले, ते भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण व्हावी म्हणून ही नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

Published by: Renuka Dhaybar
First published: August 20, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading