मुंबई 09 मे: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस आणि सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘नॅशन हेराल्ड’ची प्रकाशन संस्था असलेल्या Associated Journals Limited (AJL) या संस्थेची मुंबईतली संपत्ती जप्त करण्याचे आदेश Enforcement Directorate (ED) ने दिले आहेत. AJLचे संचालक मोतीलाल व्होरा यांच्यावर अवैध पद्धतीने संपत्ती मिळविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
मोतीलाल व्होता हे अतिशय काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ आणि सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासातले नेते समजले जातात. त्यामुळे हा गांधी कुटुंब आणि काँग्रेसला धक्का मानला जातो.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचं प्रकरण गेली अनेक वर्ष सुरू आहे. AJLची मुंबईतल्या वांद्र्यात मोक्याच्या ठिकाणी 9 मजली इमारत आहे. तब्बल 15 हजार स्क्वेअर फुट असलेली ही इमारत ईडी ने जप्त केली आहे. व्होरा हे AJLचे संचालक आहेत. तर या संस्थेवर गांधी कुटुंबाचं नियंत्रण आहे.
1938मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेराल्डची स्थापना केली होती. त्याकाळापासून ते काँग्रेसचं मुखपत्र समजलं जातं.
Enforcement Directorate (ED) attaches under Prevention of Money Laundering Act (PMLA), assets to the extent of Rs. 16.38 crores in Bandra (East), Mumbai of Associated Journals Limited in illegal land allotment case: Enforcement Directorate pic.twitter.com/3Bm7NnFZ01
— ANI (@ANI) May 9, 2020
भाजपचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याबाबत त्यांनी केलेलं वक्तव्य वादातही सापडलं होतं. नॅशनल हेराल्ड प्रकरणात डिसेंबर 2015 रोजी सोनिया आणि राहुल गांधी पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता.