मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /ईडीची मोठी कारवाई; राज्यातील 'या' कंपनीची 166 कोटींची संपत्ती जप्त

ईडीची मोठी कारवाई; राज्यातील 'या' कंपनीची 166 कोटींची संपत्ती जप्त

ED attached 166 crore rs properties: ईडीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील कंपनीवर कारवाई करत संपत्ती जप्त केली आहे.

ED attached 166 crore rs properties: ईडीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील कंपनीवर कारवाई करत संपत्ती जप्त केली आहे.

ED attached 166 crore rs properties: ईडीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील कंपनीवर कारवाई करत संपत्ती जप्त केली आहे.

मुंबई, 27 मे: ईडी (ED) म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) बँक घोटाळा (bank fraud) प्रकरणात महाराष्ट्रात एक मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील वेरॉन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (varrongroup) आणि इतरांवर कारवाई करत कोट्यावधींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने एकूण 20 अचल मालमत्ता जप्त केल्या असून त्यांची किंमत तब्बल 166 कोटी रुपये इतकी (166 crore rs properties sealed) आहे.

बनावट बिलांच्या आधारे लेटर ऑफ क्रेडिटमध्ये सवलत दिल्याचा कंपनीवर आरोप आहे. बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेतील अज्ञात अधिकारी तसेच वेरॉन कंपनीचे श्रीकांत सवाईकर यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी ईडीकडून सुरू आहे.

सुशील कुमारने केलेल्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; वाचा गुन्ह्यामागची Exclusive Story

ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील पुणे (Pune), मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील 20 निवासी फ्लॅट्स आणि भूखंड वेरॉन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे पीएमएलए अॅक्टनुसारत जप्त करण्यात आले आहेत. कंपनीने बनावट बिलांच्या आधारे बँकांच्या एलसीचा गैरवार केल्याचा आरोप आहे. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत 166 कोटी रुपये इतकी आहे.

ईडीने म्हटलं की, वेरॉन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सवाईकरंद आणि त्यांच्या सहयोगींनी ग्रुप कंपन्यांमार्फत आणि अनेक शेल कंपन्यांमार्फत अनेकदा गैरव्यवहार केल्याचं तपासात पुढे आलं आहे. तपासात असेही समोर आले आहे की, गैरव्यवहार करण्यात आलेला हा सर्व पैसा निवासी फ्लॅट्स, जमीन खरेदीसाठी वेरॉन ग्रुप वापरत होता.

First published:
top videos

    Tags: Crime, ED, Mumbai