08 मार्च : राज्याचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प तयार झाला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेवटचा हातही फिरवलाय, तर काही वेळापूर्वीच आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला आहे. दरम्यान, उद्या सादर होणारा राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असेल असा आशावाद सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय.
आर्थिक पाहणी अहवालातील ठळक मुद्दे
- राज्य सरकारवर 4 लाख 12 हजार कोटीचं कर्ज
- आर्थिक ताळेबंदात साडेचार हजार कोटींची तूट
- आर्थिक करवसुलीतील तूट 35 हजार कोटींवर
- उद्योग क्षेत्रात मंदी, पाऊसमान कमी ही तुटीची कारणं
- पाऊस कमी पडल्याने, कृषी उत्पन्नातही मोठी तूट
- विकासदर गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.7 टक्क्यांनी घसरला
- विकासदरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३ वाढ अपेक्षित
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Economic Survey Report, Session, Sudhir mungantivar, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर, आर्थिक पाहणी अहवाल, विधान मंडळ, विधानसभा