पालघरसह डहाणू, तलासरी परिसर भूकंपाच्या धक्क्याने थरथरला.. वाचा का येतो भूकंप

पालघरसह डहाणू, तलासरी परिसर भूकंपाच्या धक्क्याने थरथरला.. वाचा का येतो भूकंप

पालघर जिल्हा शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने थरथरला. गेल्या दीड वर्षांपासून या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

  • Share this:

विजय राऊत,(प्रतिनिधी)

पालघर,26 ऑक्टोबर: पालघर जिल्हा शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने थरथरला. गेल्या दीड वर्षांपासून या परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे पालघरमध्ये काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचे धक्के जाणवले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेली माहिती अशी की, गेल्या दीड वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू, कासा, तलासरी तालुक्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहे. शुक्रवारी (25 ऑक्टोबर) दिवसा आणि रात्री पालघरमध्ये जवळपास 5 सौम्य स्वरुपाचे धक्के होते. तर शनिवारी (26 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारात 2 धक्के बसल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरने केली आहे. शुक्रवारी 2.6, 2.0, 2.0, 2.4, 1.8, 1.9 रिस्टर स्केल क्षमतेचे 5 धक्के पालघरमध्ये बसल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे 4 वाजून 6 मिनिटांनी कासा, चारोटी, पेठ, शिसने, आंबोली परिसरात भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का सौम्य स्वरुपाचा असला तरी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

strong>शासकीय यंत्रणा अपयशी...

दरम्यान, दीड वर्षांपासून पालघरसह परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मात्र, यामागील कारण शोधण्यात शासकीय यंत्रणा अपयश ठरली आहे. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असले तरी या भूकंपाने घरांनी तडे गेली आहेत. घरे दुरुस्तीचे प्रस्ताव अजूनही पालघर जिल्हा परिषदेत धूळ खात पडले आहेत. त्यामुळेही स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

का येतो भूकंप?

पृथ्वीच्या पोटात सात प्लेट्स असतात. त्या सातत्याने फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स एकमेकांना धडकतात, त्या भागाला 'फॉल्ट लाइन' असे संबोधले जाते. प्लेट्स एकमेकांना धडकल्यामुळे त्यांचे कोपरे मोडले जातात. जास्त दबाव वाढला तर प्लेट्स तूटतात आणि आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. त्यामुळे या हलचालीनंतर पृथ्वीचा पृष्ठभाग हादरतो. त्याला धरणीकंप अर्थात भूकंप असे म्हणतात.

पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 09:33 AM IST

ताज्या बातम्या