Home /News /mumbai /

शिवसेनेत आणखी एक भूकंप, एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 4 खासदार; आता उरलं कोण?

शिवसेनेत आणखी एक भूकंप, एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 4 खासदार; आता उरलं कोण?

सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे.

सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे.

सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे.

    मुंबई, 22 जून :  शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde)  यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. पण, आता शिवसेनेतील नाराज असलेले आणि इच्छुक असलेले आमदार सुद्धा शिंदेंना मिळत आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेचे खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये आले आहे. एकूण ४ खासदार संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असा दावा केला होता. पण आता खासदार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहे. ४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. 1 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत तर 3 खासदार संपर्कात आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. दरम्यान, गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंचा तंबूत पोहोचला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. गुहाहटी विमानतळावर भाजपा आणि सेनेचे काही जण योगेश कदम यांना घेण्यासाठी थांबलेले आहे. तर त्यांच्यासोबत संजय राठोड हे सुद्धा पोहोचले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गटाची ताकद आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण, सेनेनं त्यांना संधी दिली नाही. योगेश कदम यांनाही पक्षाने डावललं होतं. अधूनमधून योगेश कदम हे शिवसेनेला घरचा अहेर देत होते. आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहे. दरम्यान,'आम्ही 40 आमदार सोबत आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे, ते पुढे घेऊन जाणार आहोत. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती घेऊन पुढे जात आहोत' असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही सर्व सामान्य शिवसैनिक आहोत. आम्ही कुणावरही टिका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार सोबत आले आहे. कुणाबद्दलही काही बोललो नाही. विकासाचं राजकारण केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra politics, Shiv sena

    पुढील बातम्या