'एल्गार'च्या चौकशीवरून राज्य आणि केंद्रात खडाजंगी, SIT चौकशी होणारच

'एल्गार'च्या चौकशीवरून राज्य आणि केंद्रात खडाजंगी, SIT चौकशी होणारच

भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे, दिवसभर सत्तेत कसे येऊ याचा विचार करतात, रात्री त्यांना स्वप्नही पडतात

  • Share this:

मुंबई 17 फेब्रुवारी : 'एल्गार' परिषदेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आलंय. दोन्ही सरकारांमध्ये खडाजंगी झाली असून या प्रकरणाची SIT चौकशी होणारच असं राष्ट्रवादीने जाहीर केलंय. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यात पवारांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या सर्व खात्यांचा आढावा घेतला अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले, NIAला या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला असावा. मात्र NIAच्याच नियमांनुसार कलम 10 अंतर्गत राज्य सरकारला समांतर चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ही चौकशी होणारच आहे.

मलिक पुढे म्हणाले, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून SITचौकशीची मागणी केली होती. त्यानंतर चारच दिवसांनी केंद्राने NIAकडे चौकशी दिली. आता गृहमंत्रालय याबाबत निर्णय घेणार असून SITच्या माध्यमातून समांतर चौकशी करणात येईल. या आधी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर असा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे अशी पुस्तीही पवारांनी जोडली होती.

त्यामुळे या विषयावर शिवसेनेसोबत मतभेद आहेत असं म्हटलं जात होतं. मात्र असे कुठलेही मतभेद नाहीत. काही लोक भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एका क्षणाचा विलंब जीववर बेतला असता, 3 सेकंदात काय घडलं पाहा CCTV VIDEO

भाजपच्या राज्यव्यापी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याला आता राष्ट्रवादीने उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे नेते आणि फडणवीसांवर सडकून टीका केलीय.

भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे, दिवसभर सत्तेत कसे येऊ याचा विचार करतात, रात्री त्यांना स्वप्नही पडतात अशी टीका त्यांनी केलीय. हिंमत असेल तर भाजपने लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं.

बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू, 12 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार पेपर

नवाब मलिक म्हणाले, भाजपचा हा सत्तेचा आजार वाढत जाणारा आहे. भाजपच्या नेत्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. अशा नेत्यांची जास्त काळजी वाटते. त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. आणि उपचारही केले पाहिजेत असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना इतकंच सांगू की हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक आता घ्या आणि सिद्ध करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2020 02:14 PM IST

ताज्या बातम्या