मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा भाजपच्याच लोकांमुळे पराभव, खडसेंचा मोठा आरोप

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा भाजपच्याच लोकांमुळे पराभव, खडसेंचा मोठा आरोप

भाजपमध्ये OBC नेत्यांना डावललं जातंय असंच दिसून येतंय. पक्षात अस्वस्थता आहे आणि ती वरिष्ठांच्या कानावर घातलं आहे.

भाजपमध्ये OBC नेत्यांना डावललं जातंय असंच दिसून येतंय. पक्षात अस्वस्थता आहे आणि ती वरिष्ठांच्या कानावर घातलं आहे.

भाजपमध्ये OBC नेत्यांना डावललं जातंय असंच दिसून येतंय. पक्षात अस्वस्थता आहे आणि ती वरिष्ठांच्या कानावर घातलं आहे.

  मुंबई 04 डिसेंबर : भाजपमध्ये नाराज असलेले नेते सध्या एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. नाराज असलेल्या पकंजा मुंडे यांची आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यांची ही भेट तब्बल दीड तास चालली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता टार्गेट केलंय. जो पक्षाचं नेतृत्व करतो त्यालाच जबाबदार धरलं जातं. जिंकला की सर्व श्रेय त्याचं आणि हरला की दुसऱ्यांवर जबाबदारी टाकता येत नाही असंही ते म्हणाले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाला भाजपमधलेच काही लोक जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला. खडसे म्हणाले, भाजपच्याच काही लोकांनी योग्य पद्धतीने कामं केली नाहीत त्यामुळेच पंकजा मुंडे आणि राहिणी खडसे यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांचंही असंच मत आहे. अमृता फडणवीस सरकारी बैठकांना राहायच्या उपस्थित? भाजपने केला खुलासा याबाबत पक्षातल्या ज्येष्ठांशी अनेकदा बोललो आहे. त्यांना सर्व परिस्थिती सांगितलीय. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई होईल अशी आशा आहे. पक्षातल्या ओबीसी नेत्यांना डावललं जातंय असंही त्यांनी सूचित केलं. पंकजा मुडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता अशा सगळ्यांनाच डावललं जातंय ते काय आहे असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर पक्षातले सगळे नाराज हे कायम एकत्रच येत असतात असंही ते म्हणाले. नाराजांची खलबतं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते थेट माध्यमांसमोर येत फडणवीसांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

  रश्मी ठाकरे करणार 'वर्षा'ची पाहणी, नव्या मुख्यमंत्र्यांसाठी बंगला होतोय तयार!

  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. भाजपचा संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत राहिला. त्यातच मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे आधीच हे नेते राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांच्याविषयीच्या चर्चेनंतर या नेत्यांकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Eaknath khadse, Pankaj munde

  पुढील बातम्या