Home /News /mumbai /

‘टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है’, फडणवीसांना राष्ट्रवादीचा सूचक इशारा

‘टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है’, फडणवीसांना राष्ट्रवादीचा सूचक इशारा

'अनेकांना शरद पवार यांनी घडवलं त्यांनी ऐन लोकसभेत दगा दिला, सोडून गेले, शरद पवार यांना ईडी ची नोटीस दिली. सुडाचं राजकारण केलं गेलं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. '

    मुंबई 23 ऑक्टोबर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात वेगळं दृष्य दिसलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची शरद पवारांची सूचना असतानाही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नावं न घेता सूचक इशारा दिला. यावेळी जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळलं असेल की टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है असं जयंत पाटील म्हणाले. पाटील म्हणाले, अनेकांना शरद पवार यांनी घडवलं त्यांनी ऐन लोकसभेत दगा दिला, सोडून गेले, शरद पवार यांना ईडी ची नोटीस दिली. सुडाचं राजकारण केलं गेलं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल असंही ते म्हणाले. एकनाथ खडसे यांना अखरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर नाथाभाऊंची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून अन्याय झाल्याची नाथाभाऊंच्या समर्थकांनी म्हटलं आहे. भाजपला रामराम ठोकून अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे कमळ मागे सोडत खडसेंनी आता घड्याळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या. एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शरद पवारांचे मानले आभार तर एकनाथ खडसे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे भाजपला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचा इशारा अनिल भाईदास पाटील यांनी गिरीश महाजन आणि भाजपला दिला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या