S M L

पाणी आणि वीजेअभावी नवी मुंबईच्या ई-टॉयलेटची दुर्दशा

टॉयलेट कोणत्याही क्षणी बंद पडून आपण आतमध्ये अडकू शकतो. या भीतीने लोकं वापर करत नाही. यामुळे नवी मुंबईकर या ई टॉयलेटच वापर टाळत आहेत

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 4, 2017 10:00 AM IST

पाणी आणि वीजेअभावी नवी मुंबईच्या ई-टॉयलेटची दुर्दशा

04 डिसेंबर:  देशात स्मार्टसिटी म्हणून 8 व्या क्रमांकावर आलेल्या नवी मुंबई महापालिकेने मोठा गाजावाजा करत ई-टॉयलेट उभारले. पण हे टॉयलेट काही महिन्यातच निकामी ठरले आहेत.  शहरात 25 ई-टॉयलेट उभारले आहेत.  पण सध्या हे टॉयलेट पाणी आणि वीज नसल्याने बंद पडलेत. पण याकडे महापालिकेला पाहायला वेळ नाही.

एखाद्या गरिबांचे घर तयार होईल एवढा खर्च म्हणजे तब्बल एक टॉयलेट 14 लाख रुपये खर्चून उभारण्यात आले आहेत.  पण या ई-टॉयलेटचा वापर करायला लोकं घाबरत आहेत. कारण टॉयलेट कोणत्याही क्षणी बंद पडून आपण आतमध्ये अडकू शकतो.  या भीतीने लोकं वापर करत नाही.  यामुळे नवी मुंबईकर या ई-टॉयलेटच वापर टाळत आहेत.  स्पर्धा इतर अद्ययावत शहरांशी करायची खर्चही मोठं करायचं पण त्याची निगा राखायची नाही.

हे तर नवी मुंबई महापालिकेच  नेहमीचच झालंय.  स्मार्टसिटी आणि स्वच्छ नवी मुंबईच टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच पितळ उघडं पडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 09:59 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close