• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • यंदा गोविंदा हंडी फोडणार की तशीच राहणार? उद्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

यंदा गोविंदा हंडी फोडणार की तशीच राहणार? उद्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

 येत्या 31 ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोविड 19 संसर्गाचा प्रादूर्भाव सुरूच आहे.

येत्या 31 ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोविड 19 संसर्गाचा प्रादूर्भाव सुरूच आहे.

येत्या 31 ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोविड 19 संसर्गाचा प्रादूर्भाव सुरूच आहे.

  • Share this:
मुंबई, 22 ऑगस्ट : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दुकानांपासून ते मॉल्सपर्यंत सर्वच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता सण उत्सवांवर लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्याची मागणी होत आहे. गणेशोत्सव (ganpati festival) पुढील महिन्यात आहे, पण त्याआधी दहीहंडी उत्सव (Dahihandi festival) असून त्यावर निर्बंध कायम ठेवण्याचा सरकार विचार करत आहे. येत्या 31 ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोविड 19 संसर्गाचा प्रादूर्भाव सुरूच आहे. त्यातच आता संभाव्य तिसरी लाट येणार असल्यामुळे उत्सवांवर देखिल सुरक्षेच्याकारणास्तव निर्बंध घालण्यात आलेत. कुत्रे भुंकत असतात, हत्ती थाटात चालतो, इंदोरीकर महाराजांनी केलं लंकेंचं कौतुक येत्या दहीहंडी उत्सवाला देखील कोविड 19 संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. मात्र, विरोधी पक्ष भाजप आणि मनसेने मुंबई आणि ठाणे शहरात दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केले आहे. IPL 2021 : जलेबी, फाफडा आणि तरक मेहता! RR च्या PHOTO ला सकारियाचं भन्नाट उत्तर कोविड 19 संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करणार की नाही याचा निर्णय उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांसोबत होणाऱ्या बैठकीत होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावेळी गोविंदांना थरावर थर लावत हंडी फोडता येणार की नाही, याबद्दल उद्याच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published: