Home /News /mumbai /

मला आमचे दिवस आठवले, तेव्हा ओरडून घसा कोरडा व्हायचा - अजित पवार

मला आमचे दिवस आठवले, तेव्हा ओरडून घसा कोरडा व्हायचा - अजित पवार

' त्यावेळी घोषणाबाजी करताना घसा कोरडा व्हायचा आणि मग कोणीतरी लेमनच्या गोळ्या देत असे.'

मुंबई 25 फेब्रुवारी :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम सरळ थेट निर्भिड वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था कर्जमाफी विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.  सोमवारी देखील भाजपाने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी देत सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. विशेष म्हणजे भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या काळात एक हाती सत्ता असणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तब्बल साडेपाच वर्षानंतर विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन करताना पहिल्यांदाच दिसले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या आठवणी सांगत भाजपला टोला लगावला. विधिमंडळ सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधकांची ही घोषणाबाजी सभागृहात जाणारा प्रत्येक मंत्री पाहत होता. अजित पवार यांनी नेमका हाच धागा पकडत भाजपाच्या आजच्या आंदोलनाविषयी बोलताना जुन्या आठवणी सांगितल्या. भाजपाचं आंदोलन होत असताना मला गेल्या पाच वर्षातल्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळी आधीच्या सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन करत असायचो.  त्यावेळी घोषणाबाजी करताना घसा कोरडा व्हायचा आणि मग कोणीतरी लेमनच्या गोळ्या देत असे. अशी आठवण सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला. महाविकास आघाडीविरोधात भाजपचं पहिलं आंदोलन, रस्त्यावर उतरून करणार निषेध सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पुढच्या काही दिवसात राज्याचा अर्थसंकल्प मांडलं जाणार आहे. कर्जमाफीची शेतकऱ्यांची यादी देखील प्राथमिक जाहीर केली असून पुढे टप्प्याटप्प्याने सर्व नावं जाहीर केली जातील. अशा परिस्थितीत विरोधकांनी देखील थोडासा संयम बाळगला पाहिजे असा उपरोधिक टोला देखील अजित पवार यांनी लगावला.

दादांनी काढला पराभवाचा वचपा, माळेगाव निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलने मारली बाजी

अजित पवार गेल्या काही दिवसांमध्ये भाजपावर थेट आरोप करत नव्हते अशी कुजबुज होती. त्यामागे फडवणीस आणि पवार यांनी गुपचूप केलेला शपथविधी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात होते. पण गेले काही दिवस अजित पवार यांनी देखील भाजपाला थेट अंगावर घेण्याची तयारी दाखवल्याचे दिसून येत आहे असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Ajit pawar

पुढील बातम्या