मुंबई: अज्ञात वाहनाची Duke ला धडक, हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या 2 तरुणांचा जागीच मृत्यू

मुंबई: अज्ञात वाहनाची Duke ला धडक, हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या 2 तरुणांचा जागीच मृत्यू

नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन येथून नितेशकुमार दिवेदी आणि अभिषेक हरिकेत सिंग हे आपल्या ड्युक मोटारसायकलवरून आचोळे रोडहून नालासोपारा स्टेशनकडे जात असताना ममता मेडिकल समोर हा भीषण अपघात झाला.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : नालासोपाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल आहे. तर अपघात करणारा वाहनचालक फरार झाला आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 2 तरुणांनी अपघातामध्ये आपले प्राण गमावल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन येथून नितेशकुमार दिवेदी  आणि अभिषेक हरिकेत सिंग हे आपल्या ड्युक मोटारसायकलवरून आचोळे रोडहून नालासोपारा स्टेशनकडे जात असताना ममता मेडिकल समोर हा भीषण अपघात झाला. त्यानंतर त्यांना नालासोपारा पूर्व तुलिंज येथील वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घेषित केले. या बाबत अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे. यात नितेशकुमार दिवेदी हा हॉटेल मॅनेजमेंटच शिक्षण घेत होता.

इतर बातम्या - जेलर महिला पडली कैद्याच्या प्रेमात, KISS करतानाचे फोटो व्हायरल; मिळाली शिक्षा

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या आणि गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज बीडमध्येही भीषण अपघात झाला आहे. आंबेजोगाई- केज-मांजरसुंबा रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. औरंगाबाद -मुखेड एसटीला केज तालुक्यात चंदनसावरगाव जवळ अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद इथे एसटी बस आणि जीपची धडक झाली आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

इतर बातम्या - भडकलेल्या रफ्तारने लाईव्ह शो थांबवला आणि म्हणाला - मी गोळ्या खाण्यासाठीही तयार

औरंगाबाद -मुखेड एसटी आणि कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या जीपचा चंदनसावर गावाजवळ भीषण अपघात झाला. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढलं असून सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत.

इतर बातम्या - भर रस्त्यात पत्नीला अडवून पतीने केली मारहाण, रागात फाडले कपडे

Published by: Renuka Dhaybar
First published: December 24, 2019, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading