मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...म्हणून पीएम केअर फंडातील 400 व्हेंटिलेटर्स राज्य सरकारने वापरले नाही; दरेकरांनी उपस्थित केली ही शंका

...म्हणून पीएम केअर फंडातील 400 व्हेंटिलेटर्स राज्य सरकारने वापरले नाही; दरेकरांनी उपस्थित केली ही शंका

कोरोना संकटात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोना संकटात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोना संकटात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

मुंबई, 14 मे: राज्यात कोरोनाच्या संकटात कोविड लस, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्हेंटिलेटर्स (Ventilators)वरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) गंभीर आरोप केला आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स वापरलेच नसल्याचा दावा प्रविण दरेकर यांनी केला आहे.

प्रविण दरेकर यांनी म्हटलं, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. मुंबईच नाही तर ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. औषधांचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. त्यातच राज्य सरकारकडून केंद्रावर सातत्याने टीका होत आहे की, केंद्र सराकर महाराष्ट्राला झुकतं माप देत आहे. मात्र, संकट काळात मदत म्हणून केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून दिलेले 400 व्हेंटिलेटर्स हे वापरण्यातच आले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

वाचा: पुण्यात आणखी एका लशीची निर्मिती; Covishield बरोबर ऑगस्टपासून भारत बायोटेकची Covaxin सुद्धा Made in Pune

...म्हणून 400 व्हेंटिलेटर्स वापरले नाहीत

पीएम केअर फंडातून आलेले 400 व्हेंटिलेटर्स न वापरणे हे राज्याला शोभा देणारं नाहीये. व्हेंटिलेटर्स खराब असल्याने ते वापरत नसल्याचं राज्य सरकार सांगत आहे. काही व्हेंटिलेटर्स खराब असू शकतील पण त्यासाठी 400 व्हेंटिलेटर्स न वापरणं याला काहीही अर्थ नाहीये. केवळ पीएम केअर फंडातून व्हेंटिलेटर्स आले त्यामुळे ते वापरले नाहीत अशी शंका प्रविण दरेकरांनी उपस्थित केली आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हे घृणास्पद राजकारण करू नये अशी विनंतीही प्रविण दरेकर यांनी केली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणावर काय म्हणाले दरेकर?

आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर प्रविण दरेकर म्हणाले, कुणाचेही फोन टॅप होणे योग्य नाही. नाना पटोले यांचे फोन टॅप होत असतील तर या संदर्भातील माहिती द्यावी. जर असे काही खरच झाले असेल तर सर्व प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra, Pravin darekar