मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार

मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार

येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर मुंबई आणि उपनगरातही पाऊस कायम असून मुंबईत पहाटेपासून संततधार सुरुच आहे.

  • Share this:

28 जून : राज्यभरात आज पाऊस सुरुच राहणार आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर मुंबई आणि उपनगरातही पाऊस कायम असून मुंबईत पहाटेपासून संततधार सुरुच आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.

ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक मात्र सुरळीत आहे. तर मध्य रेल्वेची वहातूक 15 ते 20 मिनिट उशीराने सुरू आहे . आणि पश्चिम रेल्वे पाच ते दहा मिनिट उशीरानं धावतेय. हार्बर रेल्वेही रुळाला तडे गेल्यानं वाहतूक थोडी मंदावलीय. पण रस्त्यावरची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

आतापर्यंत किती पडला पाऊस?

कुलाबा 63.0 मिलि.

सांताक्रुझ 51 मिलि.

दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या पावसामुळे लोकांनी घराबाहेर पडलं काहीसं कमी केलं आहे.दररोज मॉर्निंग वॉकला येणारे लोक दोन दिवस बाहेर नाही आली

 

First published: June 28, 2017, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading