पेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार

पेट्रोल, डिझेल आणि टोलमुळे स्कूल बसचंही भाढ वाढणार

वाढती महागाई, डिझेलचे वाढते दर यांच्यासोबतच ठिकठिकाणी भरावे लागणारे टोल या सगळ्यामुळे यंदा स्कूल बसच्या शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वसामान्यांचं कंबरड मोडण्याची वेळी आली आहे. त्याचा थेट परिणाम स्कूल बसच्या भाड्यावर पडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे : वाढती महागाई, डिझेलचे वाढते दर यांच्यासोबतच ठिकठिकाणी भरावे लागणारे टोल या सगळ्यामुळे यंदा स्कूल बसच्या शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वसामान्यांचं कंबरड मोडण्याची वेळी आली आहे. त्याचा थेट परिणाम स्कूल बसच्या भाड्यावर पडणार आहे. आधीच राज्य सरकारने चार टोलनाक्यांवर स्कूल बसला सवलत दिली नाही तर टोल भरावे लागणाऱ्या परिसरात सध्याच्या स्कूल बस शुल्कात प्रति विद्यार्थी ५६० रुपयांपर्यंत वाढ करण्याचे संकेत स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून देण्यात आले आहेत.

मुंबईतील स्कूल बसना मुलुंड एलबीएस मार्ग, ऐरोली, दहिसर आणि वाशी या टोलनाक्यांवर दरदिवशी तीन ते चारवेळा टोल भरावा लागतो. त्यामुळे स्कूल बसला टोलवरच १७ हजार ४०० रुपये खर्च करावे लागतात. त्यातच डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने स्कूल बसच्या मालकांना आर्थिक गणित सांभळणे कठीण झाले आहे.

त्यामुळे स्कूल बस ओनर्स असोसिएशनची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने स्कूल बसना टोलमुक्ती द्यावी, अन्यथा प्रति विद्यार्थी ५६० रुपयांची भाडेवाढ करावी लागेल, असेही बैठकीत ठरल्याचे कळते.

बात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2018 10:14 AM IST

ताज्या बातम्या