मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO : 'इतिहासाच्या तासाला कंगनाची दांडी'; काँग्रेसने अभ्यासासाठी पाठवली पुस्तकं

VIDEO : 'इतिहासाच्या तासाला कंगनाची दांडी'; काँग्रेसने अभ्यासासाठी पाठवली पुस्तकं

'इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने कंगना इतिहास विसरली'

'इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने कंगना इतिहास विसरली'

'इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने कंगना इतिहास विसरली'

  • Published by:  Meenal Gangurde

ठाणे, 18 नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना रणौतने (Actress Kangana Ranaut) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर  ठाण्यातील (Thane Congress) काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंगना रणौतला इतिहासाची पुस्तकं ( Send History Books) पोस्टाने पाठवली आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने 1947 ला भारताला मिळालेले स्वातंत्र्य ती भीक होती असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आणि अनेक ठिकाणी तिच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. (Due to Kangana Ranauts statement the Congress sent her the eighth history book)

कंगनाला दिलेला पद्म पुरस्कार परत घेण्याची तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देखील अनेक ठिकाणी मागणी झाली. ठाण्यात काँग्रेसच्या वतीने कंगना रणौतला इतिहासाची पुस्तके पोस्टाने पाठवण्यात आली आहेत. कंगनाने इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने ती इतिहास विसरली आहे. म्हणून तिला आम्ही इतिहासाचे पुस्तक पाठवत असल्याचे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिला पुस्तके पाठवली आहेत. त्याचबरोबर कंगनाला दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

काँग्रेसचे पदाधिकारी सचिन शिंदे यांनी News18 लोकमतशी बोलताना सांगितलं की, कंगनाने शाळेत असताना इतिहासाच्या तासाला दांडी मारली असावी, किंवा ती परदेशात शिकली असल्यास तिला भारताचा इतिहास माहिती नाही. त्यामुळे तिला काही पुस्तकं पाठविण्यात येत आहे. यात आठवीचं इतिहासाचं पुस्तक आणि स्वातंत्र्य चळवळीच्या पुस्तकांचा समावेश आहे. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी भाषेतील पुस्तकही तिला पाठवण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

दुसरीकडे विधानाचे ज्येष्ठ मराठी कलाकार विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांनी समर्थन केल्यामुळे खळबळ उडाली.  दरम्यान मराठी साहित्य मंडळाने (Marathi Sahitya Mandal) विक्रम गोखलेंवर देशद्रोहा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

First published:

Tags: History, Kangana ranaut