कमला मिल अग्नितांडवामुळे थर्टी फर्स्टला हाॅटेल,पब,बार व्यवसायाला फटका

कमला मिल अग्नितांडवामुळे थर्टी फर्स्टला हाॅटेल,पब,बार व्यवसायाला फटका

मुंबईतल्या हॉटेल संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार थर्टी फर्स्टला हॉटेलचा व्यवसाय निम्म्यावर आला तर पब आणि बारचा व्यवसाय तर फक्त पाच टक्केच झाला.

  • Share this:

01 जानेवारी : कमला मिल इथं झालेल्या दुर्घटनेमुळे आणि त्यानंतर बीएमसीनं केलेल्या कारवाईमुळे मुंबईतल्या थर्टी फस्टच्या पार्टीवर खूपच परिणाम झाल्याचं दिसून आलं. मुंबईतल्या हॉटेल संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार थर्टी फर्स्टला हॉटेलचा व्यवसाय निम्म्यावर आला तर पब आणि बारचा व्यवसाय तर फक्त पाच टक्केच झाला. त्यामुळे कमला मिल दुर्घटनेचा मोठा फटका हॉटेल आणि पब व्यावसायिकांना बसल्याचं मानलं जातयं. हॉटेल व्यावसायिकांनी केलेली तयारी वाया गेल्याचं म्हटलंय.

कमला मिलमधल्या मोजो पबमध्ये अनेकांनी 10 हजार रुपये अॅडव्हान्स बुकिंग केलं होतं. अगदी बाहेरगावचाही तरुणवर्ग यात होता. त्या सगळ्यांचं भरपूर नुकसान झालं.

पुन्हा अग्नितांडवानंतर महानगरपालिकेनं अनेक हाॅटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. त्यामुळे तिथेही लोक गेले नाहीत. मुंबई नेहमी सेलिब्रेशनच्याच मूडमध्ये असते, असं मानलं जातं. 31 डिसेंबरला अनेक हाॅटेल्समध्ये जागा मिळण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागते. कमला मिल दुर्घटनेमुळे कालच्या सेलिब्रेशनवर पाणी पडलं आणि हाॅटेल व्यावसायिकांचं नुकसान झालं.

 

First published: January 1, 2018, 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading