मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात रस्त्याला गेले तडे, हायवे खचण्याची भीती?

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात रस्त्याला गेले तडे, हायवे खचण्याची भीती?

दरीकडील भाग देखील खचल्याने महामार्ग पोलिसांनी या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू केलीय.

  • Share this:

चंद्रकांत बनकर, खेड 28 जुलै : मुंबई - गोवा महामार्गावर खेड ते पोलादपूर च्या दरम्यान कशेडी घाटात एक वळणावर महामार्ग खचत असून, लांबच्या लांब भेगा पडल्या आहेत, पावसाचा जोर वाढत असल्याने संध्याकाळी या भेगा रुंदावल्या आहेत. दरीकडील भाग देखील खचत असून महामार्ग पोलिसांनी या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू केलीय. वाहन चालकांना वाहने सावकाश चालवण्याचं आवाहन कशेडी टॅप महामार्ग पोलिसांनी केलंय. रस्ता खचलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत.

मंत्री असूनही पंकजा मुंडेंनीच उद्योग बंद पाडले - धनंजय मुंडे

पुन्हा मुसळधार पावसाचा धोका

मुंबई आणि कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस उसंत घेण्याची काही शक्यता नाही. पुढचे चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे पाच दिवस रायगड आणि कोकणात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. या सोबतच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही दमदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा

गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. उष्माही प्रचंड प्रमाणात वाढला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा परतला आहे. मुंबईजवळच्या कर्जत आणि वांगणी परिसरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाल्याने उल्हास नदी ओव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे हा परिसर पूर्ण पाण्याने वेढला होता. त्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्याने NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं. एक्सप्रेसमधल्या 1 हजारांपेक्षा जास्त लोकांना बचाव पथकाने बाहेर काढलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 09:36 PM IST

ताज्या बातम्या