मुंबई, 30 जून : डेल्टा प्लस व्हेरिएंट, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कोरोना लसीकरणाला वेग दिला जातो आहे. पण मुंबईत मात्र लसीकरणाला ब्रेक लागला आहे. मुंबईत उद्या लसीकरण (Corona vaccination in Mumbai) होणार नाही आहे. लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत, अससी माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे.
मुंबईतील कोरोना लसीकरणाबाबत महापालिका प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत लसीकरण होणार नाही आहे. लशीच्या तुटवड्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
Due to lack of adequate vaccine stocks, vaccination will be closed on July 1, 2021 at Government and Municipal Centers in Mumbai: Greater Mumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) June 30, 2021
मुंबईत 1 जुलै 2021 रोजी लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद असेल. सरकारी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस मिळणार नाही, असं पालिकेनं सांगितलं आहे. त्यामुळे उद्या ज्या मुंबईकरांना लस घ्यायची असेल त्यांना खासगी लसीकरण केंद्रांशिवाय दुसरा पर्याय नाही.
हे वाचा - Veg की Nonveg : तुम्ही काय खाता, यावरही अवलंबून आहे कोरोनाचा धोका
मुंबईच नाही तर राज्यातही कोरोना लशीचा तुटवडा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोना लसीकरणाबाबत (Maharashtra Covid vaccination) मोठी माहिती दिली आहे. राज्यातली कोरोना लसीकरणाचं (Covid-19 vaccination) प्रमाण कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. लशीच्या डोसचा तुटवडा (short supply of doses) असल्यानं हे प्रमाण घसरल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. दररोज 10 लाखांहून अधिक लोकांचं रोगप्रतिबंधक लसीकरण करणं ही सरकारची योजना आहे. मात्र केवळ अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं ते म्हणालेत.
हे वाचा - तिसरी लाट दुसऱ्या लाटेएवढी मोठी नसेल, संशोधकांचा अंदाज
पुढे आरोग्यमंत्री म्हणाले कि, लोकसंख्येपैकी 70 टक्के नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरणं व्हावं अशी सरकारची योजना आहे. असं झाल्यास राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल. मंगळवारी लसीकरणाचा वेग मंदावलेला दिसला. मंगळवारी केवळ 3 लाख 80 हजार लोकांना लस देऊ शकलो. गेल्या काही दिवसात हा आकडा सरासरी 7 लाखांच्या आसपास होता. एवढंच काय तर राज्यातील लशीचा साठा शून्यावर आला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Mumbai