बेस्ट संपामुळे प्रवाशांचे हाल

बेस्ट संपामुळे प्रवाशांचे हाल

बेस्टच्या संपाचा फायदा घेऊन टॅक्सी, रिक्षाचालकांनी प्रवाशांची लुबाडणूक सुरू केलीय. टॅक्सी, रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतायत.

  • Share this:

07 आॅगस्ट : बेस्टच्या वर्धापन दिनीच बेस्ट कर्मचारी संपावर गेलेत. 36 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. 30 लाख प्रवाशांना या संपाचा फटका बसतोय. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय. बेस्टच्या संपाचा फायदा घेऊन टॅक्सी, रिक्षाचालकांनी प्रवाशांची लुबाडणूक सुरू केलीय. टॅक्सी, रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेतायत.

सीएसटी परिसरात बेस्ट बसेस नसल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले तर अंधेरीतही एमआयडीसी परिसरात कामावर आणि आप्तेष्टांकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसेस नसल्याचा मोठा फटका बसलाय. रिक्षाचालक त्यांच्याकडून अवाच्या सवा भाडं आकारू लागलेत. तर घाटकोपरमध्येही पवई आणि विक्रोळीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना बसेस नसल्याने खाजगी बसेस किंवा रिक्षांद्वारे वाहतूक करावी लागली.

मात्र शहरात सगळीकडेच बेस्ट आगारांमध्ये शुकशुकाट आहे.

First published: August 7, 2017, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading