डीएसकेंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

डीएसकेंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

डीएसकेंना जामिनासाठी शेवटची संधी मिळणार आहे. गुंतवणूकदारांचे पैसे भरायला कोर्टानं डीएसएसकेंना शेवटची संधी दिली आहे. यासंदर्भात सोमवारी त्यांना एक प्रतिज्ञीपत्र सादर करावं लागणार आहे, ज्यात किती पैसे, किती कालावधीत देणार हे लिहून द्यायचं आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत पैसे दिले नाहीत तर अंतरिम जामिनाचं संरक्षण आपोआप संपेल आणि डीएसकेंना पोलिसांना शरण जावं लागणार आहे.

  • Share this:

29 नोव्हेंबर: पुण्यातले मोठे बिल्डर असलेल्या डीएसकेंना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. गुतंवणुकदारांचे पैसे थकवल्या प्रकरणी डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डीएसकेंना जामिनासाठी शेवटची संधी मिळणार आहे. गुंतवणूकदारांचे पैसे भरायला कोर्टानं डीएसएसकेंना शेवटची संधी दिली आहे. यासंदर्भात सोमवारी त्यांना एक प्रतिज्ञीपत्र सादर करावं लागणार आहे, ज्यात किती पैसे, किती कालावधीत देणार हे लिहून द्यायचं आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत पैसे दिले नाहीत तर अंतरिम जामिनाचं संरक्षण आपोआप संपेल आणि डीएसकेंना पोलिसांना शरण जावं लागणार आहे. डीएसके 200 कोटींपैकी 25 टक्के रक्कम म्हणजे 50 कोटी भरायला तयार आहेत असं त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं आहे.

डीएसकेंच्या कंपनीत अनेक लोकांनी पैसे गुंतवले होते. सहा ते सात महिने पैसे परत न मिळाल्याने अखेर लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर डीएसकेंच्या घरांवरती छापे पडले होते. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी डीएसकेंनी अर्ज दाखल केला होता. जो हाय कोर्टात मंजूर झाला. त्यानंतर आता हाय कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश डीएसकेंना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 05:28 PM IST

ताज्या बातम्या