News18 Lokmat

VIDEO: मुंबईत अभिनेत्रीने 7 गाड्यांना दिली धडक, रस्त्यात घातला धिंगाणा

अभिनेत्री रुही सिंह दारूच्या नशेत धुंद होती. त्यात तिने तब्बल 7 गाड्यांना धडक दिली. बरं इतकंच नाही तर रुहीने रस्त्यात धिंगाणा घातला.

News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2019 01:12 PM IST

VIDEO: मुंबईत अभिनेत्रीने 7 गाड्यांना दिली धडक, रस्त्यात घातला धिंगाणा

मुंबई,02 एप्रिल : मॉडेल आणि 'कॅलेंडर गर्ल' या सिनेमातल्या अभिनेत्री रुही शैलशकुमार सिंहने मुंबईच्या सांताक्रुजमध्ये नशेत धुंद तिने रस्त्यावर चक्क 7 गाड्यांना धडक मारली आहे. या अपघातामुळे गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. अभिनेत्री रुही सिंह दारूच्या नशेत धुंद होती. त्यात तिने तब्बल 7 गाड्यांना धडक दिली. बरं इतकंच नाही तर रुहीने रस्त्यात धिंगाणा घातला. सगळ्यात धक्कादायक म्हणजे तिने दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत घातली आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा बॅचदेखील काढला.
Loading...

 

View this post on Instagram
 

#Repost @spotboye (@get_repost) ・・・ TV Starlet #ruhisingh Barges Into KFC Bandra & insults Police Officer; Minutes Later She Bangs Into Parked Cars At Santacruz😱


A post shared by ShudhDesi Hindi (@shudhdesihindi) on

रुहीने 4 दुचाकी आणि 3 कार्सला धडक दिली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रुही इतरांशी भांडण करत आहे. रुहीने दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली. दरम्यान पोलिसांनी आपल्याला त्रास दिला असा आरोप रुहीने केला आहे.

या सगळ्या प्रकाराविरोधात पोलिसांनी रुहीला ताब्यात घेतलं असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस आता यात अधित तपास करत आहे.


VIDEO पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...